mummas

प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात योगसाधना – Maternity Yoga In Marathi

- Marathi - March 3, 2019

नमस्कार मैत्रीणींनो!
मी,सौ. गौरी मिलिंद देशपांडे, माझे शिक्षण एम. ए.(मराठी) झाले असुन,मी ‘योगविद्याधाम’ नाशिक येथून ‘योगशिक्षक’ ही पदवी संपादन केली आहे|

तुमच्याशी, गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेपश्चात योगाचे काय-काय फायदे होतात हयाबद्दल मी हितगुज करणार आहे. ‘आई’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर प्रेमाचा मुर्तिमंत झरा असलेली आपली आई दिसते. लग्नानंतर ‘आई’ होण्याची प्रत्येक स्त्रिची ईच्छा असते. परंतु हल्लीचे धकाधकीचे जीवन ,वाढत्या काळज्या ,ताण-तणाव ह्यामुळे ब-याच स्त्रियांची ही ईच्छा पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होतात, तसेच हल्ली वयात आलेल्या मुलींमध्ये मासिक पाळी अनियमित असणे, PCOD(Polycystic ovarian Disease) ह्यामुळे पुढे लग्नानंतर गर्भधारणा होण्यास अडथळ निर्माण होतात|

ह्या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे ‘योगसाधना’ होय. अर्थात प्रत्येक स्त्रिने आपल्या स्त्रिरोग तद्न्यांकडून स्वत:ची तपासणी करून घेऊन त्यानुसार औषधोपचार करणे आवश्यक आहे.पण त्याला ‘योगसाधनेची’जोड दिली तर ‘दुधात साखर’ गर्भधारणेपूर्वी सुर्यनमस्कार,आसने,प्राणायाम यामुळे मासिक पाळी नियमीत होण्यास मदत होते. गर्भधारणा झाल्यानंतर सुलभ आसन,प्राणायाम,ध्यान,शवासन व योगनिद्रा या माध्यमातून गर्भवती स्त्रिचे आरोग्य तर चांगले राहतेच शिवाय गर्भावर उत्तम संस्कार हाेऊन त्याची बाैद्धिक क्षमता आणि आकलन शक्ती वाढते|
गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीची मानसिक स्थिती जरा नाजूक झालेली असते. अशा वेळी तिला मानसिक आधाराची गरज असते| तेव्हा घरातील मंडळींनी तिला समजून घेण्याची गरज असते,विशेषत: पतीने. गर्भधारणेनंतर स्त्रीयांनी याेग्य मार्गदर्शनाखाली याेगाभ्यास केल्यास त्यांना नक्कीच फायदा हाेईल|
माझी एक विद्यार्थिनी दुस-या बाळाच्या वेळी गर्भवती होती. तेव्हा मी शिकविलेल्या आसन प्राणायामातून तिला बराच फायदा झाला. तिच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तिला दम्याचा त्रास होत होता,तो नंतरच्या बाळंतपणात अजिबात झाला नाही. इतकी ताकद योगसाधनेत आहे|
आणखी एका विद्यार्थीनीने गर्भधारणेच्या सातव्या महिन्यात योगसाधना सुरू केल्यावर तिला पहिल्या दिवसापासुनच योगासने व शवासन केल्याबरोबर खुप रिलँक्स वाटू लागलं. पुढील महिन्यात ती फिरायला देखील जाऊ लागली. जे पूर्वी तिला अशक्य वाटत होतं.
गर्भवती महिला गर्भधारणाझाल्यापासुन ते नवव्या महिन्यापर्यंत केव्हाही योगसाधना करू शकतात. पण हे सर्व योग्य मार्गदर्शनाखाली,तद्न्यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे.
आता आपण गर्भधारणेनंतर ( प्रसुती पश्चात ) करावयाच्या योगाभ्यासाची माहिती घेऊ. जसे गर्भधारणेदरम्यान मानसिक आधाराची गरज असते, त्याप्रमाणे गर्भधारणेपश्चात देखील मानसिक व शारीरिक स्वास्थाची गरज असते. प्रसुतीनंतर गर्भाशय हळूहळू आकुंचन पाऊन पूर्ववत होण्यास, तसेच शारीरिक बांधा सुडौल राहण्यास योगासनांमुळे जास्त फायदा होतो. प्राणायामामुळे मानसिक स्वास्थ उत्तम राहण्यास मदत होते.
सध्या जरी एरोबिक्स,झुंबा आणि जिम चे युग असले तरी योगसाधनेचे महत्व अनन्यसाधारण आहे. योगसाधनेमुळे शरीर थकत तर नाहीच शरीराचे शिथीलीकरण होऊन शरीरात ऊर्जा-उत्साह निर्माण हाेताे.निराेगी मातेच्या पाेटी निराेगी बालक जन्माला आले तरच आपल्या देशाला सुजाण नागरिक मिळतील. पर्यायाने ह्या सुप्रजेमुळे समाज व देश प्रगती करेल.
गर्भवती स्त्रीयांसाठी याेगसाधनेच्या उपक्रमामध्ये मला माझ्या सर्व कुटुंबीयांचे सहकार्य लाभले. मी वैद्यकीय द्रुष्टीकाेनातून याेगाभ्यास शिकविण्याचा कटाक्ष बाळगते.
साै.छाया अम्रुते ह्या माझ्या एके काळच्या विद्यार्थिनी,परंतु त्यांना असलेल्या योगसाधनेविषयीच्या तळमळी मुळे त्यांनी ही वेबसाईट तयार केली. तिचा तुम्हा सा-याजणींना निश्चीत फायदा होईल. त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतांना मला विशेष आनंद होत आहे. त्यांच्या ह्या वेबसाईटला माझ्या अनेक शुभेच्छा!
शेवटी एकच म्हणावेसे वाटते,
‘ शुद्ध बीजापाेटी असती फळे रसाळ गाेमटी’
‘याेगसाधना करा, स्वस्थ रहा.’
पुन्हा भेटू! धन्यवाद!

साै. गाैरी मिलिंद देशपांडे
याेगशिक्षिका

 

Also Read About

https://shade.agency/simple-parenting-marathi/

 

Join Our Mummas Community Now ! !

Being a Mom is not at all easy as everyone thinks. There are lot of expectations, decisions to take, work, challenges and what not. Mothers usually forget themselves while raising their kids.
But wait, you should not do this. You are a Mother and hence deserves everything whatever you wish. Join this Millennial Indians Moms group to connect with like-minded moms where moms help and support each other in every way.

TAGS:
0 Comments
Leave a Reply